Marathi History






#६ मार्च १६७३
कोंडाजी फर्जद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून
पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली.
कोंडाजी फर्जंद यांनी साठ मावळ्यांसह पन्हाळा घेतला.
महाराज निहायत खूश झाले कोंडाजी फर्जंदांची
अस्मानी फत्ते झाली.
मोहिमेसाठी २००० तरी याने मागणं अपेक्षित होतं पण मराठे जातीचेच
निधड्या छातीचे!
किती सैन्य मागावं याने?
कोंडाजी फर्जद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं
राजे, ३०० गडी द्या फक्त...!!
राजे अचंबित झाले!
कोंडाजी फक्त ३००? पुरतील?
कोंडाजी म्हणला, राजे, ६०च पुरेत,
पण अगदीच मोजके नको म्हणून३००.
राजांनी आपलं कडं काढून कोंडाजीला दिलं,
कोंडाजी खुश झाला.
किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू,
कुठं कुठं तोफा आहेत?
किल्लेदार कुठं असतो?
पहारे कुठं कमी आहेत आणि नेमकी माहिती कळली.
दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके १५९५,
६मार्च १६७३!
कोंडाजी ६०जण घेऊन पुढे गेले आणि बोलले गड घेतो, गड घेऊन
इशारत झाली की मग गडावर या.
त्यानं सैन्यासोबत अनेक कर्णे दिले होते तो नियोजनाचा भाग होता.
सर्वजण गडाखाली गेले, दोर लाऊन सपसप कडा चढून गेले.
तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले,
पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते.
इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु
झाले.
किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला.
#Ek_aathavan_shivrayanchi 
आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या.
किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला.
कील्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता.
नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला
आणि मुंडक उडालं.
किल्लेदार पडला?!!!
सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की
किल्लेदार पडला.
पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती
तो किल्ला अवघ्या ६०जणांनी घेतला
गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले,
तोफांना बत्त्या दिल्या.
एक स्वार रायगडी राजांच्याकडे पाठवला.
तो किल्ल्यावर गेला तो दिवस
चैत्र शु.प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा.

Comments